चिंतनि रामायण रंगते

 १. चिंतनि रामायण रंगते

रसिक हो रामभक्त श्रोते चिंतनि रामायण रंगते ! ध्रु.
रामापुढ़ती मंडल करुनी, रंगुन जावे ग्रंथश्रवणी 
भाग्य भरा येते!

रामायण ये पुन्हा ऐकता, पारायणफल हाती येता 
हृदयी ये भरते!१

किति गुण गावे श्रीरामाचे, कौतुक वाटे वाल्मीकींचे 
मस्तक ते लवते!२

कर्तव्याची येथे महती, भावनेंहुनी ज्ञाते म्हणती 
अर्थ गहन प्रकटे!३

राम गुणांचा राजा आहे, मनामनातुन वसला आहे 
रामी मन रमते!५

सकलांचा हा प्राण विसावा, रामचंद्र हा भुलतो भावा 
शबरी साक्ष इथे!६

भरतभेट हे दृश्य मनोरम, जिवाशिवांचा सुमधुर संगम 
सज्जन मन बनते!७

आत्मा रामच सकल जनांचा, शोध अंतरी लागायाचा 
बसु या ध्यानाते!८

तनेमने श्रीरामा भजता, एक एक गुण शिकता शिकता 
वर्तन पालटते!९

कलह संपती व्यसने सुटती, भक्तिपथावर चलता पुढती 
फलश्रुती येथे!१०

समाजजीवन घ्यावा अनुभव, प्रौढत्वातही जपणे शैशव 
सगळे हे जमते!११

श्रवण करावे गीती गावे, गीती गावे समरस व्हावे 
भक्ति दृढ होते!१२

मन है निर्मळ सुंदर बनते, रामराज्य भूवरती येते 
स्वप्न सत्य होते!१३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
संकल्पना : जयंत कृ. देवधर
श्रोतेमुखी रामायण

Comments

Popular posts from this blog

रामसीताविवाह

रावण वध मीमांसा

श्री हनुमंताचा प्रसाद