Posts

Showing posts from April, 2024

आरति श्रीरामा गाऊ !

 ३५. आरति श्रीरामा गाऊ ! आरति श्रीरामा गाऊ ! ध्रु. नाम घेउ या, काम करू या  अंतरि त्या ध्याऊ !१ प्रेम करू या, मधुर वदू या  दुःख सुखे साहू !२ नम्र होउ या, विद्या शिकु या  योगीजन होऊ !३ जसे गाउ या, तसे होउ या  सत्संगति साधू !४ लाभ होउ दे, हानि होउ दे  खंबीरच होऊ !५ आत वळू या, आत रमू या  ध्यानामृत सेवू !६ लोभ न कसला, मत्सर कुठला ? सुशांत नित राहू !७ तन हे मंदिर, राघव ईश्वर  इथे तिथे पाहू !८ त्याग शिकू या, योग शिकू या  उंचावर जाऊ !९ व्यसन नसावे, स्मरण असावे  सावध नित राहू !१० तत्त्व शिकू या, कृती करू या  तेजस्वी होऊ ! ११ सत्य वदू या, सत्य जगू या  सत्यव्रती होऊ !१२ विजनि राहु या, जनी मिसळु या रामायण गाऊ !१३ रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले श्रोतेमुखी रामायण संकल्पना : जयंत कृ. देवधर

कल्याण करी रामराया!

 ३४. कल्याण करी रामराया! कल्याण करी रामराया ! रामराया ! जनहित विवरी ! जनहित विवरी !ध्रु. कोण असे मी समजत नाही  काय करू मी उमजत नाही  तू मज बोध करी दयाळा !१ हताश का मी समजत नाही  तमोगुण मला सोडत नाही  कल्पित दुःख हरी कृपाळा !२  स्वकर्म मजला रुचतच नाही  सुधारणा तर घडतच नाही  कर्मी कुशल करी दयाळा ! ३ घडी घडी तर वाया गेली  सत्कृत्याची संधि दवडली  अजून दक्ष करी कृपाळा ! ४ मी माझे हे विसरत नाही  देहबुद्धि ही सुटतच नाही  तू मन शुद्ध करी दयाळा ! ५ तव पूजन मी कसे करावे  अभ्यासी मी कसे रमावे ?  आसनि स्थिर बसवी कृपाळा! ६ प्रपंच हातुन घडव नेटका कृतीकृतीतुन मुरव विवेका  ज्ञानी मजसि करी दयाळा !७ परमार्थाचें मर्म कळू दे  इथे तिथे मज तोच दिसू दे  प्रज्ञावंत करी कृपाळा ! ८ देहदुःख मज सुख वाटावे  विलासात मन नच गुंतावे  अलिप्त पूर्ण करी दयाळा!९ खेडोपाडी मला हिंडवी  सेवा काही हातुन घडवी  तत्पर मजसि करी कृपाळा !१० दासबोध तू शिकव आतुनी  आत्मारामा येई धावुनी  तळमळ तू शमवी दयाळा !११ रामामधला राम द...

दासबोध सांगे

 ३३. दासबोध सांगे दासबोध सांगे स्मरा रामनाम ! ध्रु. नाम घेता वाटचाली,  यज्ञ पावलो पावली न लगे द्यावा दाम !१ नामी वसते देवत्व,  वाचे स्फुरवी कवित्व  जीवन हो सुखधाम !२ येता जाता घोकावे,  नामस्मरणे हरखावे  शुद्ध स्वरूप नाम !३ कष्ट न कसले देहाला,  नाम जोडता श्वासाला  वर्मबीज प्रभु नाम!४ नामच वैभव रामाचे, नामच आलय शांतीचे  अधनाचे धन नाम !५ पातकराशी जळतात,  स्वकर्म कुसुमे फुलतात  नाम जपावे अविराम !६ सोयर नाही सुतकहि नाही, स्थलकालाचे बंधन नाही  कसेहि करुनी घ्यावे नाम !७ तीर्थक्षेत्रे नामात,  पूजाद्रव्ये नामात शिवहि घेतसे नाम !८ निराश होऊ नको मना,  नको रडू रे कुढू मना  अमृतमय ते घे नाम !९ शरीर देऊळ मानावे,  अंतरि रामा निरखावे  सोऽहं हंस श्रीराम !१० अभ्यासाला बसावे,  नित्य राघवा भेटाबे  अजपाजप चालवि राम !११ भक्तिपथावर चाल तरी  भीतिमुक्त होशील तरी  सोबत करतो श्रीराम !१२ विसर्जन करी मोहाचे विसर्जन करी शोकाचे  रात्रंदिन तू जप रे राम ! १३ रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले श्रोतेमुखी रामायण

श्रीगोंदवलेकर महाराजांच्या जीवनात श्रीराम

 ३२. श्रीगोंदवलेकर महाराजांच्या जीवनात श्रीराम श्रीराम जयराम जयजय राम ! ध्रु श्रीरामाचे घ्यावे नाम  हळू हळू व्हावे निष्काम अंतरंग रामाचे धाम !१ नामामध्ये मला पहा  स्वानंदातच सदा रहा गोंदवले स्फूर्तीचे स्थान !२ श्रीरामाला पाहू चला नामाने गुरु भेटविला  अनुभव ऐसा आला छान !३ विषय वासना दूर पळे  श्वासासंगे नाम जुळे  ध्येय ध्याता ध्यानहि राम !४ तुकामाइने प्रेम दिले  सुखदुःखी सम मज केले जीवन विद्येचे हे गान !५ सत्य मधुर वच बोलावे  मना मनाला जोडावे पूल चांगला आहे नाम !६ घरात रामा आणावे  घर आपले मंदिर व्हावे  भल्या बुऱ्याचा साक्षी राम !७ पोशाखीपण नको नको  संग्रह करणे वेड नको  सर्वस्वाचा दाता राम !८ आपण सगळे सेवक हो  मालक राघव आहे हो  कृतज्ञतेने घ्यावे नाम !९ शरीर मंदिर जाणुन हो  पवित्र निर्मल राखू हो  निर्व्यसनी तो असे सुजाण!१० प्रपंच रामाचा जाणा  अलिप्ततेचा घ्या बाणा  नाव लावतो तीरा राम!११ छंद धरूनी नामाचा  निरोप घेणे जगताचा  अंतकाळि सोडविता राम!१२ नामस्मरणच पथ्य असे  समाधानही खूण दिसे ...

स्वभाव पाहु या!

 ३१. स्वभाव पाहु या! तटस्थ होउन आपण अपुला स्वभाव पाहू या! राम नि रावण काय व्हायचे आधी ठरवू या!ध्रु.  विकारवश तो रावण झाला संयम मग सुटला विचार करता राम जीवनी संयम शिकलेला तोल मनाचा राखायाला भक्तीने शिकु या!१ देहामध्ये रावण दडला अंतरात नाम नाम स्मरता सरे वासना प्रकटे श्रीराम निर्धाराने आपण अपुला स्वभाव बदलू या!२ अहंकार जणु मद्य प्राशुनी रावण उन्मत्त विनम्रता ती रामापाशी मोहित करी चित्त हवे हवेसे सकला आपण सत्वर होऊ या!३ दशाननाला स्वार्थाने त्या नष्टभ्रष्ट केले त्यागाने श्रीरामाला त्या उंच उंच नेले सर्वात्मकता श्रीरामाची आपण मिळवू या!४ सत्तेसाठी रावण जगला जीवन ते कसले?  सेवा करुनी रामराय तर मनोमनी आले भक्तिदीप हा करी घेउनी वाटचाल करु या!५ कामुकता त्या दशाननाची मुख झाले काळे वैराग्याने श्रीरामाचे जीवन ते उजळे नामासक्ती विषयि विरक्ती आपण मिळवू या!६ तमोगुणाने दूषित रावण अंत कसा त्याचा सत्त्वाचा श्रीरामच पुतळा भाव कसा त्याचा सत्य शिवाचे सुंदरतेचे पूजन हो करु या!७ बहिर्मुखाला भविष्य कसले त्याचा हो नाश अंतर्मुख श्रीरामच आत्मा जाणा अविनाश देहातुन त्या देवदिशेला पुढती जाऊ या!८ जीवनभर...

संस्कारांनी घडला राम

 ३० संस्कारांनी घडला राम संस्कारांनी घडला राम  रघुपति राघव राजाराम पतितपावन सीताराम!ध्रु राजा रक्षक संतजनांचा  संहारक तो दुष्टजनांचा  समूर्त पौरुष म्हणजे राम !१ गुरुगृहातच लाभे शिक्षण  क्षात्रत्वाचे ते संगोपन  व्यायामे बलसागर राम !२ राम धनुर्धर सदाच हसरा  पूर्णचंद्र तो गमेच दुसरा  शांत सुशीतल सुभाष राम!३ मायपित्यांची सेवा करतो  भावंडांवर पाखर धरतो  कृपाछत्र हे प्रेमळ राम !४ विश्वामित्रे यज्ञ मांडले  रघुनाथाने रक्षण केले  विघ्ननिवारक बलिष्ठ राम !५ पतितांना हा धरतो हृदयी  शिळाहि स्पर्शे साध्वी होई  पारसमणि हा मेघश्याम !६ जनक कुमारी येत जीवनी  दोन कुलांची झाली जुळणी  पवित्र संगम सीताराम !७ अशक्य जगती काही नसते  यत्नावाचून सर्व राहते भगीरथांचा वंशज राम !८ जैसी जनता तसेच 'शासन'  हवे हवे ते जनताशिक्षण जनतेचा ही शिक्षक राम !९ सुयोग्य शासक हवा असे जर  प्रजा असावी कार्यी तत्पर  लोकनाथपद भूषवि राम !१० कुटुंबवत्सल जैसा होता  प्रजानुरंजक त्याहुन होता  या राष्ट्राचा नायक राम !११ त्रस्त जगाला...

जीवनात श्रीराम

 २९. जीवनात श्रीराम बालपणी मज अंकी घेउनि आई होउनि वाढविले  श्रीरामा मज आठवले !१ पिता होउनी धोपटुनी कधि दक्ष राहुनी वळण दिले  श्रीरामा मज आठवले!२ गुरुजन जितके तुझीच रूपे हासत विद्याधन दिधले  श्रीरामा मज आठवले!३ बंधू भगिनी मित्र-मैत्रिणी या रूपे मज सौख्य दिले  श्रीरामा मज आठवले!४ भजन, निरूपण, प्रवचन, कीर्तन, भक्तिगीत हो ऐकविले श्रीरामा मज आठवले!५ देवघरातील मूर्ती चित्रे तुझीच रूपे जाणवले  श्रीरामा मज आठवले!६ वियोगदु:खी जवळ येउनी कुणी न  तुजविण शांतविले श्रीरामा मज आठवले!७ प्रभात समयी जाग आणुनी रामनाम नित घेवविले  श्रीरामा मज आठवले!८ नाम स्मरता सुधा होउनी अंतरि जाउन तोषविले श्रीरामा मज आठवले!९ ध्याना बसता श्वासासंगे नाम जोडुनी तू दिधले श्रीरामा मज आठवले!१० माझ्या नकळत मला सावरत भक्तिपथावर आणवले  श्रीरामा मज आठवले!११ रुचे न पूजा तरी आग्रहे पूजेला मज बैसविले  श्रीरामा मज आठवले!१२ कृतज्ञ रामा तुझा नेहमी मी चुकता तू सावरले  श्रीरामा मज आठवले!१३ रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले श्रोतेमुखी रामायण संकल्पना : जयंत कृ. देवधर

बोला जय जय जय हनुमान

 २८. बोला जय जय जय हनुमान राम राम गाता गाता मन झाले बेभान बोला जय जय जय हनुमान!ध्रु.  श्रीरामाचा पहिला दास, स्वामीसाठी श्वास नि श्वास रामा जीव की प्राण!१ प्राणांमध्ये नाम मिसळले उंच उंच हे मन मग गेले तेच तेच हनुमान!२ रविबिंबाला गगनी पाहुन असे वाटले घ्यावे कवळुन ध्येयास्तव उड्डाण!३ गोटिबंद हे शरीर व्हावे, कार्य कराया समर्थ व्हावे वज्रासम बलवान!४ ज्या त्या हृदयी वसला राम असे अनावर झाले नाम नम्र तोच बलवान!५ पवनापासुन वेग घेतला श्वासातुन विश्वास लाभला रघुनाथाची आण!६ दुःख नि चिंता भुते पळाली, कर्तव्याची स्फूर्ति मिळाली बजरंगी वरदान!७ राम भजावा जीवेभावे नसे राम ते फेकुन द्यावे भक्तीचे महिमान!८ श्रीरामाचा असा जिव्हाळा, सागर तर ओलांडुन गेला अजिंक्य वीर महान!९ सीता छे आईच भेटली, सर अश्रूंची झरली गाली ऋणानुबंध महान!१० द्रोणागिरि ये सहज पेलता श्रीरामाचा शब्द झेलता सज्जन गाती गान!११ नमस्कार सूर्यास घालता बालपणी ये तनी वज्रता शक्तीचे महिमान!१२ श्रीरामाचा दूत बनावे श्रीरामाचे कार्य करावे अनुसरणे हनुमान!१३ रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले श्रोतेमुखी रामायण संकल्पना : जयंत कृ. देवधर

तनामनाला औषध नामी

 २७. तनामनाला औषध नामी तनामनाला औषध नामी रामायण गावे !ध्रु. रघुवीराची विक्रमगाथा  ऐकताच लवताहे माथा रोमांचित व्हावे!१ संस्कारांनी उजळे जीवन  म्हणूनि करणे नित पारायण आत्मरूप ध्यावे!२  रामनाम हे असो जिभेवर  मनास नामे बसतो आवर मने आत जावे!३  कर्तव्याची जी परिपूर्ती  तीच खरी आत्म्याची शांती अनुभवास यावे!४  निर्भय निःस्पृह होता येते  दुस्तरासही तरता येते प्रोत्साहन घ्यावे!५ उतरायाची कठिण कसोटी दिव्यस्फूर्ती दे जगजेठी नामामृत प्यावे!६ स्वदेश मजला राघव वाटे स्वधर्मपालन पूजन वाटे पूजित मी भावे!७ ध्याने कळते मर्म कथेचे बंधन तुटते देहबुद्धिचे स्वराज्य लाभावे!८ रामनाम नित स्मरता स्मरता रामायण जीवन ये जगता स्वप्न सत्य व्हावे!९ राम अंतरी वसला आहे कल्याणाचे सांगत आहे तसेच वागावे!१० रामच गावा, रामच ध्यावा रामच ध्यावा राम पहावा रामांकित व्हावे!११ रामाठायी वसे देवपण रामायण हे सद्गुणदर्शन सद्‌गुण जोडावे!१२ विशुद्ध व्हावे समाजजीवन उन्नत व्हावे समाजजीवन प्रयत्न चालावे!१३ रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले  श्रोतेमुखी रामायण  संकल्पना : जयंत कृ. देवधर

जीवनात आणू या राम

 २६. जीवनात आणू या राम जीवनात आणू या राम  श्रीराम जयराम जयजय राम ! ध्रु.  विवेक आहे सखा सोबती  भक्तिपथाने चरण चालती  गाठायाचे मंगलधाम !१  नाम मनाला करील सज्जन उत्साहाला हेच निमंत्रण  कर्मे करता गाळू घाम !२  खरा कोण मी ओळख पटते  करू काय मी आतुन सुचते  अनुभूती दे आत्माराम !३  परिस्थिती आव्हान देउ दे  आत्मश्रद्धा हुंकारू दे  ते पेलाया शक्ती राम !४  सत्य असे हा धर्म सनातन  तो तर जपणे प्राणहि अर्पुन  निर्धाराचे नावच राम !५  पुढचे पाउल पुढेच पडते  यज्ञासम सत्कर्मच घडते  सद्धर्माचा प्रेरक राम !६  जगावयाचे राष्ट्रासाठी मरावयाचे राष्ट्रासाठी  दीपस्तंभच आहे राम !७ संघटना ही शक्ती आहे  उपासना ही युक्ती आहे  शक्तियुक्तिचा दाता राम !८ 'रामायण' ना जुने पुराणे  ते अस्सल सोन्याचे नाणे  श्वासासंगे घेऊ नाम !९ नाम स्मरता प्रभात होते  अज्ञानाचे तिमिर लोपते  अरुणोदय घडवी श्रीराम !१० चारित्र्याला जपावयाचे दक्ष  दक्ष सदोदित असावयाचे  चिंतामणि रामाचे नाम !११ कुलधर्मां...

दासबोधातून श्रीराम

 २५. दासबोधातून श्रीराम श्रीराम जयराम जय जय राम!ध्रु. दासबोध हा ग्रंथ असा अध्यात्माचा देत वसा  मना घ्यावया लावी नाम!१ बोधाचा करता मान शिष्याचे हो कल्याण  आत्मसुखाची पडे न वाण!२ एक एक ओवी घ्यावी मनात अपुल्या भिजवावी  पठण असे गंगाजल पान!३ सावधान तो असे सुखी बेसावध होतो दुःखी  आत्मारामच सौख्य निधान!४ प्रपंच न लगे सोडावा विवेक साथी जोडावा  सदनच होई मंगलधाम!५ विचारेच हो सार्थकता सत्यालागी अनुसरता  आनंदाचा कंदच राम!६ साधकास साधन पूरवी संशय तिळही नच उरवी  देहाचा नुरतो अभिमान!७ बरे बोलता सुख वाटे अनुभवास जर हे येते  ज्या त्या जीवा माना राम!८ मी माझे हे विसरावे मी रामाचा घोकावे  चितांना दे पूर्ण विराम!९ आळस रावण समजावा उद्यम राघव मानावा  यत्नाचे गावे महिमान!१० होणारे होत जाते चित्त न काही डळमळते  सत्त्वगुणाचा दाता राम!११ काळ कसाही येऊ दे राघवपदी मन राहू दे  श्वासाला हे जुळू दे नाम!१२ रामदास माझी आई अंतरि येउनिया राही  दासबोध मुक्तीसोपान!१३ रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले श्रोतेमुखी रामायण  संकल्पना :  जयंत कृ. देवधर

रावण वध मीमांसा

 २४. रावण वध मीमांसा सोन्याची ती लंका जळली, प्रजाहि सारी कष्टी झाली असला कसला राजा रावण झाला तो नष्ट पुण्यप्रतापासंगे असता धर्मविजय स्पष्ट!ध्रु.  शक्ति वापरा स्वामीसाठी शक्ति वापरा धर्मासाठी नका वापरू स्वार्थासाठी नरदेही हो कशास होता आचरणे खाष्ट? सत्तेचा हव्यास कशाला? जनसेवेचा का कंटाळा? जो तो द्रव्या का भुललेला? परनारीची अभिलाषा तर करीतसे नष्ट!२ पतिव्रतेचे ना ऐकियले विषयविलासी मन बरबटले व्हायचेच ते अंती झाले विनाशकाली सुबुद्धीच हो होत असे नष्ट!३ शिवभक्ती ती वरवर होती त्या ज्ञानाची कसली महती? मातिमोल तर केली नीती रावणवध हा सांगुन जातो धर्मकार्य श्रेष्ठ!४ रावण आजहि अत्याचारी रावण आजहि भ्रष्टाचारी या दैत्यांना कोण संहरी?  मनामनातुन राघव जागो ही मनिची आर्त!५ दुर्गुणलंका जाळायाची शूर्पणखा ना रक्षायाची गोष्ट ऐकणे कल्याणाची मदोन्मत्त तो रावण होई आचरणी भ्रष्ट!६ शौर्याला द्या जोड नीतिची दानाला द्या जोड मतीची कर्माला द्या जोड भक्तिची प्रसन्न होईल रामचंद्र ही जाणुन उद्दिष्ट!७ श्रीरामाचे साह्य घेउ या अहंकार रावणा वधू या चला वंदु या मारुतिराया रामकथेचा ध्यानी घ्यावा इतुका मथितार्थ!८ ...

मनोबोधातून श्रीराम दर्शन

 २३. मनोबोधातून श्रीराम दर्शन श्रीराम जयराम जय जय राम! ध्रु. मनोबोध तू मुरव मना, जे कळले ते सांग जना उठता बसता घ्यावे नाम!१ मोह तुला का देहाचा? ध्यास न का तुज देवाचा?  अंतरि शोधी 'आत्माराम'!२ संशय सगळा सोडुन दे सत्संगी तुज रंगू दे  नामातून दे सोबत राम!३ अनुभव नसता वटवट रे अनुभव येता आनंद रे  सोऽहं ध्यानी आहे राम!४ सौख्याचे ही सौख्य असे देवांचा ही देव असे  अंतरि भवती एकच राम!५ लोभ नको रे द्रव्याचा क्षोभ नको रे चित्ताचा  नश्वर ते दुःखाचे धाम!६ मना धनंजय असशी रे समर्थ माधव असती रे  गीता गायन दे विराम!७ त्या देवाला अंत नसे भक्तिपथा मुक्काम नसे  मना नाम घे हो निष्काम!८ अता भांडणे कोणाशी? मत्सर तरि कुठला करशी?  एकपणा तो आत्माराम!९ जे जे संकट राघव रे उपाय तोही राघव रे  धीर धरी नच सोडी नाम!१० दासबोध हा छोटासा कल्पवृक्ष गमतो खासा  मननासाठी घ्यावे नाम!११ हताश होणे बरे नव्हे कर्म टाळणे योग्य नव्हे  प्रयत्न म्हणजे प्रभु श्रीराम!१२ आसुरि संपद सोडत जा दैवी गुण तू जोडत जा म्हणशिल तू, मी आत्माराम!१३ रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले श्रोतेमुखी र...

श्रीरामाला रुचते का हे

 २२. श्रीरामाला रुचते का हे  'कसे वागतो, कसे बोलतो' गोष्ट जरी ही साधी  श्रीरामाला रुचते का हे? विचार करू या आधी!ध्रु. सरळ मनाने विचार करणे दुसऱ्याचे तर हृदय जाणणे  क्षमाशीलता कृतीत येता साधे सहज समाधी!१  नाम मुखी ते नित्य असावे  नामासंगे रंगत जावे  चंद्रासम जर झालो शीतल, करील काय उपाधी?२  विनम्र व्हावे शिकत रहावे वडीलधाऱ्यां सुखवित जावे  करू परिश्रम, घर मग आश्रम, बरी राहणी साधी!३  संयम थोडा शिकता आला हवाहवासा मानव सकलां  कृतीतुनी संस्कृतीच दिसते सार जाणु या आधी!४  आसक्ती कसलीच नसावी  ऐसी भक्ती कृतीत यावी  दासाचा हो देव मारुती सारे जग त्या वंदी!५  विचार आचारात असू दे  जसे बोलतो तसे चालु दे सुसंगती ही सुखद सुखदशी परमार्थाची नांदी!६ वनात जाता ये काटकपण  निरीक्षणातुन मिळते शिक्षण  नच मर्यादा ज्ञान मिळविण्या व्हावे तत्पर आधी!७  सत्कर्माला यज्ञ म्हणावे  यज्ञरक्षणा सुसज्ज व्हावे  पुण्य प्रतापासंगे असता कोण जुमानी व्याधी?८  'मी कर्ता' ऐसे न म्हणावे  रामच कर्ता ध्यानी घ्यावे बंधुभाव...

ऐका श्रीरामाची कथा

 २१. ऐका श्रीरामाची कथा ऐका श्रीरामाची कथा ! कथा ऐकता मिटेल सगळी  अंतरातील व्यथा ! ध्रु. उदार न्यायी राजा दशरथ,  स्त्रिया पतिव्रता वरितो सत्पय  पुत्र परि नव्हता!१ मुनी सांगती यज्ञ करावा,  यत्न करावा वर मिळवावा  प्रसाद ये हाता!२ एकच का सूत चार जन्मले पुरुषार्थाचे दर्शन घडले  सुखवी रामकथा!३ परस्परांशी गोड वागता  सेवाभावे गुरु तोषता  ज्ञानलाभ हाता!४ दैत्य मारिले यज्ञ रक्षिले  राम नि लक्ष्मण सवे चालले  ती तर अद्वयता!५ शिळेसारखी पडून राहिली  राम भेटता जागृती आली  स्वरूप आठविता!६ रामाने शर धनुस जोडता  भंगे शिवधनु विस्मय जगता  प्रमुदित भूमिसुता! ७ विघ्नच वरवर आत सुसंधी अशुभातुन शुभ निघते अंती  राम वना निघता!८ छायेसम सौमित्र संगती  भरतही उतरे प्रेमकसोटी  उदात्त मन दिसता! ९ कपटी रावण पळवी सीता  आमंत्रण निजमरणा देता रंगत जाय कथा!१० मारुतिराया सेवक झाला,  सीतेचाही शोध लागला  योग्य दिशा मिळता! ११ महती मोठी स्त्री शीलाची,  आग सांगते श्रीलंकेची वंदित हनुमंता!१२ मारूनि रावण युद्ध संपले बिभीषणा...

सुश्लोक श्रीरामाचे

 २०. सुश्लोक श्रीरामाचे कथा राघवाची मनाने कथावी । कथा राघवाची मनाला कथावी  मनाने मनाला सुधारीत जाता। रघूनाथ अंगे निवारील चिता १ घनश्याम श्रीराम सद्भाव आहे। घनश्याम श्रीराम तो आत आहे।  तया घेउनी नाम तू आळवावे । प्रभू संकटी धाव घेई स्वभावे २ मना सज्जना राम चिंतीत जावा । सदाचाररूपी प्रभू ओळखावा ।  जया रामविश्वास तो भाग्यवंत । जया रामविश्वास तो धैर्यवंत ३ तुझे कार्य चालो नको खंड काही । कृती वावगी तो करू देत नाही ।  तुझ्या वर्तनी जो अहंकार दैत्य । तया विंधण्या चापपाणी समर्थ ४ जरा मीट डोळे पहा आत आत । जनी वा वनी वसावे निवांत ।  विकाराविना वा विचाराविनाही। तुला जाणवे गोड निःस्तब्धताही ५ नको कामना पूर्वजांच्या धनाची । नको वासना बंगल्याची घराची ।  तुझे धाम श्रीराम चैतन्य आहे । सदा लक्ष्य तेथेचि ठेवूनि राहे ६ खरा वारसा सद्गुणांचा मनाचा । खरा वारसा सत्कृतीचा मतीचा ।  खरा संत तो जो करी वृत्ति शांत । क्षमाशील श्रीमंत तो युक्तिमंत ७ असे हो जया अंतरी भाव जैसा । वसे हो तया अंतरी देव तैसा ।  हवा राम ज्याला तये राम व्हावे । जसा ध्यास ज्याला तसा तो स्वभावे ८ मन...

रामायण गावे

 १९. रामायण गावे जीवनातले भक्तितत्त्व हे आहे हनुमंत बलोपासना गुणोपासना करते श्रीमंत !१ 'जीवनमूल्यावरची श्रद्धा' जाणा श्रीराम  श्रीरामाचा लाभ जीवनी आळविता नाम !२ परिश्रमाचे नाव लक्ष्मण आज्ञेचे पालन आज्ञांकितता दासालागी प्रिय प्राणांहून !३ पादसेवनी रत झालेला सातत्ये भरत कर्तव्याच्या उपासनेने रामा प्रिय होत !४ शत्रुघ्नहि तो असे विनाशक विकारशत्रूंचा सेवेचा आनंद अलौकिक असून नसण्याचा !५ समाधान ती सीतामाई ज्याचे त्या ठावे  रामायण हे सद्भक्ताच्या आचरणी यावे !६ देहामधले रामायण हे ऐकावे गावे घराघराची होय अयोध्या स्वप्न सत्य व्हावे !७ विकारलंका पेटवून द्या ते कसले सोने ?  एक असू द्या ध्येय उराशी जीवन करू सोने !८ सामजस्ये रामराज्य ये रामाची आण सांगा का कधि वाया गेला रामाचा बाण ?९ एक एक गुण मिळता घ्यावा कौतुक देवाला  सन्निध राहुन नित्य पाहतो अपुल्या भक्ताला !१० नामस्मरणे सुधारते मन देवालय बनते  राम जीवनी आहे आहे आतुन जाणवते !११ सदा सर्वदा योग तयाचा घडो हाच ध्यास  नामाविण ना गोड लागतो अन्नाचा घास !१२ ज्ञानयज्ञ हा नामयज्ञ हा रामायण गावे गावे भावे जनां आदरे प्रेमे सां...

श्रीराम-प्रसाद

 १८. श्रीराम-प्रसाद जा बाळांनो रामायण गा गा बाळांनो रामायण गा!ध्रु. घराघरातुन राम वाढवा  अंतरिचा सद्भाव जागवा  कर्तव्याला वरती जागा!१ शौर्य कथत जा रघुरायाचे  सत्य कथत जा श्रीरामाचे  चिंतन करतो तो नर जागा!२ बंधुप्रेमा उपमा नाही  त्यागाला तर सीमा नाही  मनापासुनी रामचरित गा!३ सत्ता जगती काय करतसे ?  भावाला भगवंत भुलतसे  अमृतमय श्रीरामायण गा!४ सेवा करुनी मिळवा मेवा  देवांनाही वाटो हेवा  नव्या युगाचा नवा वेद गा!५ धन हे येई तैसे जाई  सत्कर्माची कीर्ती राही  शीलधनाला जपण्याला गा!६ घराघरातुन श्रोते मिळतिल  विघ्ने अवघी झणी पांगतील श्रीरामाचे यशोगान गा!७ सदाशिवासम दु:ख पचावे  चंद्रासम स्मितवदन असावे  वनवासी श्रीराम गीत गा!८ नामरसायन औषध नामी  प्रल्हादासम रमाच रामी  न्यायनीतीने सदैव वागा!९ पतिनिष्ठा ती पत्नीव्रत ते  मोल जाणती ज्ञाते श्रोते  जीवनगीता आळवून गा!१० उपासनेने तेज चढतसे बलोपासना शक्ति देतसे  बलभीमाचा पोवाडा गा!११ तुमच्यावरती केंद्रित दृष्टी घाम गाळुनी फुलवा सृष्टी  एकत्वाचा विणण्...

रामसीताविवाह

 १७. रामसीताविवाह असा तसा हो नकाच समजू विवाह सीतारामांचा! ध्रु. मेघश्यामा माळ घालता कणकण मोहरलीसे सीता  मायाब्रह्माचे ते मीलन गजर जाहला वाद्यांचा !१ नयनांनी श्रीराम पाहिला नकळत तेथुन अंतरि आला  भक्ती वरते श्रीभगवंता छंद जिवाला नामाचा ! २ ज्याची होती वाट पाहिली अवचित त्याची प्राप्ती झाली  रामाचरणी सर्व समर्पण असून अनुभव नसण्याचा ! ३ तने दोन परि एकच आत्मा सोऽहं श्रीराम तो परमात्मा  अशी निरंतर खेळीमेळी प्रपंचही परमार्थाचा ! ४ 'मी माझे पण' मावळलेले ऐसे दोघे समरस झाले  समाजार्थ हे जीवन आहे विसर व्यक्तिगत स्वार्थाचा ! ५ भरून येती फिरून डोळे घर्मजले कर झाले ओले  उधाण आले सात्त्विकतेला मुहूर्त कैसा भाग्याचा ? ६ सीतारामांची ही जोडीं वर्णाया भाषाच तोकडी  परस्परांना पूरक दोन्ही विषय जाहला नवलाचा ! ७ गुणरूपांचा अपूर्व संगम गंगायमुनांचे हे मीलन  राम सावळा सीता गोरी ठेवा हा लावण्याचा ! ८ सत्यावर निष्ठा रामाची पतिमय झाली सीता कधिची  द्वैताला ना मुळीच थारा विलास आत्मारामाचा ! ९ न बोलताही मनोगत, नकळत होती पूर्ण मनोरथ मागितल्याविण सगळे मिळते अनुभव पृथ्वीम...

तेथे दर्शन रामाचे

 १६. तेथे दर्शन रामाचे जेथे जेथे दिसे दिव्यता  जेथे जेथे दिसे भव्यता  तेथे दर्शन रामाचे! ध्रु. समुदायाची संघभावना  संताच्या हृदयाची करुणा  औदार्य ही जे मेघाचे! १ निर्भयता ती वीराची  निरलसता जी कर्माची  विनम्रपण जे शिष्याचे! २ आईची जी वत्सलता  चंद्राची जी शीतलता  सोशिकपण जे संतांचे! ३ हिमालयाची उंची ती  वारिनिधीची खोली ती  असीमपण आकाशाचे! ४ सत्यवचन पालन करता  मेरूसम चित्ती स्थिरता  अभंगपण जे वज्राचे! ५ तृषाशमन जीवन करते  पूर्णब्रह्म पोषण करते  जिथे सहजपण नित्याचे! ६ कर्मफलाची आस नसे  गुरुचरणी सद्भाव असे  हार गुंफले सुमनांचे! ७ नामामध्ये राम खरा  आत्मबोध हा खरा भाविक ऐसे भाग्याचे!८ टापटीप ती गृहिणीची  उद्योजकता पुरुषाची  पूरकपण नरनारींचे!९ कल्पकता शास्त्रज्ञांची  प्रतिभा ती कविरायाची  मोहकपण ते शिल्पाचे!१० शिस्तबद्धता सैन्याची  समयबद्धता सूर्याची  अचूकपण जे कालाचे! ११ मने मनाला शिकवत असता  मनें मनाला सुखवत असता  समाधान जे चित्ताचे! १२ ध्येयध्रुवावर दृष्टि हवी...

श्रीरामचिंतन प्रसाद (२)

 १५. श्रीरामचिंतन प्रसाद (२)  स्मरू या बलसागर श्रीराम ! स्मरू या गुणसागर श्रीराम!ध्रु. 'आज्ञापालन ' माय पित्याचे  व्रत हे ठरले आयुष्याचे  व्रतीस कोटि प्रणाम!१  'बंधुप्रेमा' उपमा नाही  त्यागाला तर सीमा नाही रघुकुलभूषण राम!२  'मर्यादेचे करीत पालन '  जितेंद्रिय हा दशरथनंदन मुनिजनमनविश्राम!३  सुखदु:खी सम सदैव राही  तोल मनाचा ढळू न देई  'स्थितप्रज्ञ ' श्रीराम '!४ वनवासींचा मित्र 'खरोखर  भावजीवनी रमला सत्वर  लोकांचा अभिराम!५  पत्नीशी हा अनन्य राही  हवे-नको ते आपण पाही कोमलहृदयी राम!६ 'समर्थ' हा रघुवंशी आहे  डिंडिम अजुनी गाजत आहे  अनुपमेय श्रीराम!७  वैयक्तिक सुख दूर सारले सीतेला ही वनि पाठवले  असा विरागी राम!८ रामराज्य तत्त्वाचे आहे  रामराज्य त्यागाचे आहे  प्रजाहितैषी राम!९  मनःसंयमन, शुद्ध आचरण कृतीकृतीतून ईश्वरदर्शन  सकलांचा आराम!१० नाम जयाचे मंत्र जाहले नामांकित पाषाणहि तरले-  ऐसा तारक राम!११  राजांमधला योगी आहे  योग्यांमधला राजा आहे  योगिराज श्रीराम!१२...

श्रोतेमुखी रामायण

 १४. श्रोतेमुखी रामायण श्रोतेमुखी रामायण । तनामना घडे स्नान  कर्तव्याचे येई भान । ज्याला त्याला। १ ज्याला त्याला गाता येई । आनंदाचा लाभ होई  मन उंच उंच जाई । नीलाकाशी ।२ नीलाकाशी दिसे राम । जाणवे तो आत्माराम  अज्ञानाचे नुरे नाम । विद्यानंद। ३  विद्यानंद कलानंद । कलानंद योगानंद  योगानंद भावानंद । सामरस्ये।४ सामरस्ये गाता गाता । रामनाम घेता घेता  देहभाव लया जाता । समाधान । ५ समाधान चिंतनाने । समाधान अर्थज्ञाने  समाधान विस्ताराने । कोठेही जा । ६ कोठेही जा मिळे प्रेम । राम वाहे योगक्षेम  पाळवून घेई नेम । स्वाध्यायाचा।७  स्वाध्यायाचा खुले मार्ग । जीवा न्यायानेंच वाग  भक्तिपंथे चालू लाग । दास बोधे  ।८  दास बोधे सोडी स्वार्थ । हाच हाच परमार्थ  जोडी राम होई राम । अभ्यासाने ।९  अभ्यासाने त्यागी होशी । अभ्यासाने ज्ञानी होशी  अभ्यासाने योगी होशी । याच जन्मी।१० याच जन्मी मिळे मुक्ती । कर्माची ती कळे युक्ती  अंगी बाणे शुद्ध भक्ती । गाता गाता ।११ गाता गाता मिळे शांती । विश्रांतीचीहि विश्रांती  अनायासे होय प्राप्...

पतितपावन श्रीराम

 १३. पतितपावन श्रीराम पतितांना पावन करी, असा श्रीराम एक भूवरी!ध्रु.  तळमळ तळमळ निशिदिनि होते रामभेटीची ओढ लागते चरणस्पर्शे पावन झाली सती अहल्या खरी!१ पश्चातापे तनमन पोळे शांत कराया अश्रु धावले पातक सगळे धुवून टाकुन रामचंद्र उद्धरी!२ संतसंगती राम देतसे उत्कर्षाचा मार्ग खुलतसे झाले गेले ते गंगार्पण वास राम मनि करी!३ प्रत्येकाला भविष्य आहे घडवायाची संधी आहे निराशेतुनी फुलवी आशा स्वामी भवभय हरी!४ टाकीचे आघात सोसणे जसे घडवितो तैसे घडणे पाषाणातुन मूर्ति प्रकटे कारागिरी ही खरी!५ चुकता चुकता शिकता येते पडता पडता बाळ चालते करुणासागर राममाउली बालकास सावरी!६ संकट असते एक कसोटी धैर्य लाभते श्रद्धेपोटी खचू न देई जराहि हिंमत नाम स्मर अंतरी!७ धीर धरी रे धीरापोटी असती मोठी फळे गोमटी कवि केशवसुत सांगुन गेले चिंतन त्यावर करी!८ नियमांनी मन बांधुन घ्यावे व्रती बनावे तपी बनावे निश्चयबळ ते वाढत जाते घे घे अनुभव तरी!९ हवी दक्षता क्षणाक्षणाला  काय करी विषयाचा घाला? संरक्षक श्रीराम भरवसा संतत हृदयी धरी!१० कर्म न टळते कधी कुणाला निजकर्माचा का कंटाळा? परिश्रमाने जीवन घडते पाठ गिरव तू तरी!११ अंधारात...

यज्ञरक्षण

 १२. यज्ञरक्षण एक आम्हाला आहे ठावे, यज्ञाचे रक्षण करणे ! ध्रु. सत्कर्माला यज्ञ म्हणा  मी नच कर्ता हे जाणा  देवासम ना दुसरा कोणी, भार तयावर सोपविणे !१ पोलादाची अमुची छाती  मोठी माता इथली माती  पाउल पुढती नेटे पडते वज्रासम मानस होणे !२ दैत्यांचा प्रतिकार करू  आली विघ्ने दूर करू  भित्यापाठि तर ब्रह्मदैत्य हो, धैर्याचा पर्वत बनणे !३ यज्ञ न केवळ कुंडात  यज्ञ नांदतो त्यागात  तनमनधन देशास वाहता, जीवन उजळे तेजाते !४ व्यसनांना समजा दैत्य  घातक रूढी या दैत्य ज्ञानाने अज्ञान सारू या, अशांतास शांती देणे!५ कुंभकर्ण जो आळस तो  राष्ट्रजीवना पोखरतो  परावलंबी कुणी नसावा जळो, जिणे लाजिरवाणे !६ भुकेल्या जना तृप्त करू  रुग्णांनाही स्वस्थ करू  आरोग्याची महती कळता, यत्नालागी कुठे उणे?७ खेडोपाडी हिंडावे  जे जे ठावे शिकवावे  देवघेव ज्ञानाची करता, बल देशाचे होत दुणे!८ साधेपण आचारात  सात्त्विकपण आहारात  श्रीमंती ती खरी मनाची, जनी जाणता हे जाणे!९ रक्षिले असे यज्ञाला  तर तो रक्षी अपणाला  परस्परांशी समरस व्हावे, प्रे...

देहातले रामायण

 ११. देहातले रामायण दहा इंद्रियांच्या देहाला दशरथ राजा शोभे नाम  नाम स्मरता वेध लावितो आत्मा म्हणजे तो श्रीराम!१ कौसल्या कैकेयि सुमित्रा, त्रिगुणांच्या त्या प्रतीक हो  जरी नियंत्रित देती त्या सुख, सूत्र निरंतर स्मरणे हो!२ रामचंद्र आराम मनाला, विवेक संयम तिथे असे  सत्यवचन अमृतमय भाषण, स्वभाव त्याचा ठरलासे!३ लक्ष देउनी कार्य करतसे, अनुजा लक्ष्मण नाव असे  रामच होते लक्ष्य मनाचे, बंधुप्रेमा मनी बसे!४ भाव मनी भरताच्या भरला, राम तयाचा प्राणच हो  रामपादुका झाल्या दैवत, कर्तव्यानें पूजन हो!५ विकारास ना स्पर्शू देई, शत्रुमर्दना सुसज्ज हो  शत्रुघ्नहि ते नाव शोभते, आक्रमणा कुणि धजे न हो!६ सेवा है सौंदर्यच होते, जनकसुता ती सीता हो  पतिव्रता त्यागाची मूर्ती सात्त्विकता ती होती हो!७ बलभीमाविण रामायण ना सेवा शक्ती युक्ति तशी कर जुळलेले उत्सुक कार्या मनात ठसली युक्ति अशी!८ मना माझिया रामनाम गा आवड त्याची लागेल जीवनातला राम दिसे मग समाधान तुज लाभेल!९ बिभीषणाला अभय लाभते असत्पक्ष जर सोडतसे पश्चात्तापे मन हो निर्मळ झोप सुखाची लागतसे!१० कर्तव्याला मानुन पूजन पूजनात त...

घराघरात जावी रामकथा !

  १०. घराघरात जावी रामकथा ! घराघरात जावी रामकथा !  मुले व्हावी रामासम, आणि मुली सीता ! ध्रु.  सत्य धर्माचे पालन, मायपित्यांना वंदन  सज्जनांचे संरक्षण, दुर्जनांचे निर्दालन गुण अंगी मुरवावे, रामनाम घेता ! १ नको अहंतेचा वारा, नको वासनेला थारा  हवा वात्सल्याचा झरा, अनाथांना पोटी धरा  नका घरातच थांबू, पाहा देश स्वतः ! २  राम व्हावे की रावण? बिभीषण कुंभकर्ण !  वाली मेला दुर्गुणानं, वाचे सुग्रीव भक्तीनं  वाल्या होय थोर, मन पालटता ! ३ दिली मर्यादा आखुन, करू नये उल्लंघन  मना घ्यावे आवरून, आत्मरूप ते लक्षून  कशी स्वर्णमृगे, पस्तावे सीता ! ४ महाबली बजरंग, रामी रंगे अंतरंग झुंजे राक्षसांच्या संगं, परि वीर तो निःसंग  रामभेट होण्याला, वंदा हनुमंता ! ५ गावे गीतरामायण, ऐका गीतरामायण देहभान हरपुन, करा जीवनाचं सोनं हीच दसरा दिवाळी, साधुसंत येता ! ६ सेतु सागरी बांधावा, अहंदुर्गही जिंकावा  रामदासाचा सांगावा, धीर धरावा धरावा  संघटना करी काम, संघयुग आता ! ७  घ्याहो घ्याहो रामनाम, येई जीवनात राम  हात धरी ज्याचा राम, त्यास सदाचा आर...

श्रीरामचिंतन प्रसाद

 ९. श्रीरामचिंतन प्रसाद ! स्मरू या बलसागर श्रीराम ! स्मरू या गुणसागर श्रीराम! ध्रु.  शांत सुशीतल सुमधुर भाषण, करुणावचने अमृतसिंचन  श्रांतांचा विश्राम ! १ अवघे जीवन प्रखर साधना, कण कण झिजणे गती चंदना  तप्तासी आराम ! २ पतितांचा उद्वार करावा, निरर्थकाला अर्थ मिळावा  दीनो‌द्वारक राम ! ३ हा भरताचा शत्रुघ्नाचा, सौमित्राचा सुग्रीवाचा  सख्यभाव अभिराम ! ४ सुता धरेची पुत्र नभाचा, संगम गमला अलौकिकांचा  जानकीजीवन राम ! ५ वनवासी जन जवळ धरावे, एकविचारे एकवटावे  कुशल संघटक राम । ६ यौवराज्य वा विजनवास वा, समान दोन्ही मनी गारवा  ऐसा शांताराम ! ७ सत्यपथाचा राघव यात्रिक, माणुसकीचा राघव मांत्रिक  पुरुषोत्तम श्रीराम ! ८ शौर्य शोभते विश्वासासह, राम धनुर्धर निज अनुजांसह  वीराग्रणी श्रीराम ! ९ देहीं असला तरी विदेही, तयास वरिते ती वैदेही  हा तर आत्माराम ! १० ज्याच्या त्याच्या अंतरि आहे, मना सज्जना शोधुन पाहे  दासाचा श्रीराम ! ११ असुनि नसावे नसुनि असावे, कार्य करावे दूर राहावे  कमलपत्र श्रीराम ! १२ कृतीत यावा एक एक गुण, श्रीरामाचे हे तर पूजन...

श्रीरामायणरहस्य-चिंतन

 ८. श्रीरामायणरहस्य-चिंतन राजा दशरथ नीतिमंत तो बलशाली होता  कौसल्या शालिनी सुशीला त्याची पतिव्रता !१ त्यांच्या उदरी यत्नरूप अवतरे प्रभू राम  लक्ष्मण आाला शक्ति घेऊनी बंधू गुणधाम !२ भरताच्या मनि बंधुप्रीती सरल हृदयता ती अनुकरणे शत्रुघ्न धन्य हो बालक शुद्धमती!३ सत्यरूप सीतेने वरिले श्रीरघुनाथाला धरती उल्हासाने भेटे जैसी गगनाला!४ कांचनमृगमोहाने फसली व्याकुळली सीता  अहंकाररावणे झडपली संधी सापडता!५ श्रीरामाच्या नामस्मरणे कल्याणच झाले  भक्तिरूप हनुमंते पतिचे कुशल सर्व कथिले!६ अहंकारदैत्याला वधिता सफल रामकार्य  रामायण सांगते, मानवा पणा लाव शौर्य!७ यत्ना अंती यश ठरलेले विनम्रता भक्ती  या देहातच मुक्ति लाभण्या सापडते युक्ती!८ अशांत लंका शांत अयोध्या पोचावे तेथे  विकारवादळ चित्तामधले नीतीने शमते!९ नीती सुटता विटंबना ती त्रैलोक्यी होते  सांगे भारत उभ्या जगाला 'सत्यमेव जयते'!१० कुटुंबनीती हे रामायण पारायण करणे  सौहार्दाने सामर्थ्याने नारायण बनणे!११ सेवाभाव नि टापटीप ती काय कमी येथे ?  गृहलक्ष्मी ही संस्कारांनी घर मंदिर करते!१२ श्रीरामाची कथा ऐक...

रामनामगजर

 ७. रामनामगजर रघुपति राघव राजाराम  पतितपावन सीताराम!ध्रु. प्रेमाने हा गजर करू, भवसागर हा पार करू  कर्म घडावे ते निष्काम!१ नरनारी मंदिर आहे, राम अंतरी रमताहे  भजने होई मंगलधाम!२ शबरी भोळी मी व्हावे, सेवेने जन सुखवावे  जे जे दिसते ते ते राम!३ ओघे आले काम करू, श्रीरामाचे नाम स्मरू  देहबुद्धि लोपविते नाम!४ सत्कार्याच्या पाठी राम, उत्साहाला पुरवी राम  सेतुबंधना संघच राम!५ घाम गाळुया शेतात, मोत्ये भरती कणसात  श्रमात नांदे रघुपति राम!६ निर्व्यसनी तो भक्त खरा, सदा हसतमुख वीर खरा त्याला कळला प्रभु श्रीराम!७ द्रव्याचा हव्यास नसो, कामचोरपण नसो नसो  कर्मे करता गाळू घाम!८ श्रीरामाचे घर आहे, घर कसले? मंदिर आहे  जनी मनी घुमताहे राम!९ गृहलक्ष्मीला सुखवावे, नारायण मग म्हणवावे  सदन होतसे शांतीधाम!१० कर्तव्याचे भान हवे, चिंतन सुचते नवे नवे  अंतरि हासे आत्माराम!११ मायतात हे गुरु असती, बालमंडळी ती शिकती  सदैव राहो याचे भान!१२ समाज राम व्यक्ती राम, संस्था राम सेवक राम श्रीरामाला नम्र प्रणाम!१३ रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले श्रोतेमुखी रामायण स...

समजुनी घेऊ श्रीरामायण

 ६. समजुनी घेऊ श्रीरामायण रामप्रभूंचे घेऊ दर्शन  समजून घेऊ श्रीरामायण!ध्रु. अंतरातला राम पाहू या  रामनाम प्रेमे गाऊ या  अतिशय पोषक ते भाविकपण!१ विवेक आणिक सत्यप्रीती  ध्यानी येते रघुकुलरीती  त्यागभावना उजळत जीवन!२ श्रीरामाच्या मनी गारवा  भरताच्या हृदयात गोडवा  लक्ष्मण शिकवी आत्मसमर्पण!३   सुख हे द्रव्यामध्ये नाही  पर्णकुटीतही शांती राही  स्वावलंबनी रम्य मधुरपण!४ ध्येयास्तव सुखदुःखे साहू  ध्येय ध्रुवावर दृष्टी ठेवू  सुगंध वितरत झिजते चंदन!५ बलाढ्य रावण होय पराजित  अशी यशःश्री ती पुण्यांकित  सर्व राहते यत्नावाचुन!६ वचनापेक्षा कृती बोलते  तत्त्व अमोलिक ठसवुन जाते  आपण होऊ कृतीपरायण!७  ठरो अयोध्या नगरी नगरी  चला आणवू राम अंतरी  नरच होतसे श्रीनारायण!८  दुसऱ्याचे सुख ते माझे सुख  ऐसे वाटे जर अंतर्मुख  अनेकांतही दिसो एकपण!९  का कोणाचा करणे हेवा  रुचेल कैसे दयाळ देवा?  कृतीत वचनी असो मधुरपण!१० मनात येता उन्नति होते  कर्म कधी ना वाया जाते  सेवाभावे उजळू जीवन...

श्रीरामजन्म

 ५. श्रीरामजन्म मनात राम जम्मला  तनात राम खेळला! ध्रु. नामरूप राम तो, रामदास सांगतो  राम लावतो लळा!१ मी न देह जाणवे, मी न बुद्धि जाणवे  बोध मोदवी मला!२ राम हा इथे तिथे, मीहि तोच वाटते  ध्यास लावि सावळा!३ का निराश व्हायचे? रडायचे-अडायचे?  यत्न देव थोरला!४ रामरंगि रंगणे, मोहपाश तोडणे असाच राम जन्मला!५ राम जागवी मला, राम बैसवी मला कंठ आज दाटला!६ मुक्तिलाभ होतसे, नित्यभेट होतसे  काय वानु सोहळा!७ समर्थयोग राम रे, समर्थभक्ति राम रे देहभाव लोपला!८ पुढे पुढेच जायचे, का कुणास भ्यायचे?  निश्चयो असा भला!९ सोबती असो नसो, ध्येय जे मनी ठसो क्रमीन पंथ एकला!१० नित्य राम जन्मतो, मजसवेच बोलतो ध्यानछंद लागला!११ भाग्यवंत मी असे, रामदास होतसे  शीत वाटती झळा!१२ जोम जीवनी मिळे, भक्ति रोपटे डुले अश्रुपूर लोटला!१३ रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले श्रोतेमुखी रामायण संकल्पना : जयंत कृ. देवधर

श्री हनुमंताचा प्रसाद

 ४. श्री हनुमंताचा प्रसाद मागतोस तर हा 'प्रसाद' घे  होई दास श्रीरामाचा !ध्रु. सेवा करता तनमन हरपुन  देहातच दे राघव दर्शन  छंद धरी तू सत्कार्याचा!१  'मी पण' जाता उजळे जीवन  मन पवनाला मिळते जाउन  मानकरी तू रवितेजाचा!२  मी नच कर्ता रामच कर्ता  श्रेय यशाचे प्रभूस देता  आवडता तू हो सकलांचा!३ स्वामींवर धर असीम निष्ठा  द्रोणागिरि ये सहज पेलता  सागर तू हो उत्साहाचा!४  कर्तव्याच्या मार्गावरती  कंटक सुमने लगेच होती  अनुभव घे रे समरसतेचा?५ शक्तिसंचया मना आवरी  रामरूप सगळे नरनारी  धडा गिरवशी दास्यभक्तिचा!६ आशीर्वच हे श्रीरामाचे  जयां लाभती ते भाग्याचे  गजर करी तू श्रीरामाचा!७  कांचनात का राम असे तो?  भक्ताहृदयी राम राहतो  ध्यास धरी श्रीरघुनाथाचा!८  सेवक, सैनिक दोन्ही होशिल  सावधान या मंत्रा जपशील  तो तर सागर करुणेचा!९  राम नि रावण काय व्हायचे ?  तुझ्या कृतीने ठरावयाचे  विचारवंतच तो भाग्याचा!१०  हातुन घडते जधी सत्कृती  राम प्रभू आलिंगन देनी  ध्यास...

श्रीहनुमंतापाशी मागणे

 ३. श्रीहनुमंतापाशी मागणे मारुतिराया या देहातच दर्शन देई रे श्वासोच्छ्वासी सहवासाचा अनुभव देई रे!ध्रु. प्रभातकाली रामनाम तू उच्चारुन घेई पवनासंगे मनास अमुच्या जोडुन तू देई  नीलगगनि तो राम सावळा दाखव दाखव रे!१ उद्योगी उत्साह तूच रे प्रयत्नात शक्ती रघुनाथाची भक्ति तूच रे योजनेत युक्ती  नित्याची ती कर्मे घडता रामा भेटव रे!२ धरतीवरती पदे पडावी चलता ठेक्यात  श्रीरामाचा जप चालू दे तेव्हा हृदयात  तेज रवीचे इळको वदनी अंजनिकुमरा रे!३ रुंद रुंदशी छाती द्यावी प्रहार झेलाया स्वकर्मकुसुमे गुंफू माळा तुजला पूजाया  आत्मबुद्धिचा वज्रासम तू निश्चय देई रे!४ द्रोणागिरि पेलला करावर सांभाळून आणला  लंकेला जाळले, रावणा विक्रम दाखविला  सीतेला शोधले प्रयत्ने विमल बुद्धि दे रे!५ 'जय बजरंगा जय हनुमंता' जयजयकार करू  तुझिया आशीर्वादे आम्ही अजिंक्य वीर ठरू  बालक रामा दास्यभक्ति तू आपण शिकवी रे!६ रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले श्रोतेमुखी रामायण  संकल्पना : जयंत कृ. देवधर

त्रयोदशाक्षरी मंत्र

 २. त्रयोदशाक्षरी मंत्र श्रीराम जयराम जय जय राम!ध्रु. धाव मनाची बाहेर, दौडत जाई चौफेर  मना उलटता होते नाम!१ 'चिता करतो विश्वाची,' कैसी वचने बाळाची?  नारायण त्या सार्थचि नाम!२ वेड लागता नामाचे, बंधन गळले देहाचे  सोऽहं हंसः प्रभु श्रीराम!३ नकोस गुंतू तू कामी, तुझ्या मनाचा तू स्वामी  अंतरि वसला आत्माराम!४ 'दासबोध' तू जाणावा, मनोबोधही बाणावा  त्या दोन्हीतुन दिसेल राम!५ वाणी तुकया देहूचा, अभंग ही त्याची वाचा  भंडाराही घेतो नाम!६ मंडाले वा वाड्यात, लोकमान्य ते स्थिरचित्त  गीता त्यांना दे विश्राम!७ ग्रामसफाई करताना, बापट गाती हरिभजना  श्रीहरि हे मुखि त्यांच्या नाम!८ मांडीवर खेळे बाळ, रुणझुणती त्याचे चाळ  त्याच्या कानी जावो नाम!९ नाम मनाचे अन्न असे, भक्तिभाव हा पोसतसे  कर्म घडतसे ते निष्काम!१० प्रपंच आहे रामाचा, हे जाणे तो भाग्याचा  अंतरि त्याच्या रंगे नाम!११ चिंता कसली करू नये, रामाला विस्मरू नये  येता जाता घ्यावे नाम!१२ तनामनाचे रोग बरे, रामराय हे वैद्य खरे  अनुभव ऐसा देते नाम!१३ रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले संकल्पना : ज...

चिंतनि रामायण रंगते

 १. चिंतनि रामायण रंगते रसिक हो रामभक्त श्रोते चिंतनि रामायण रंगते ! ध्रु. रामापुढ़ती मंडल करुनी, रंगुन जावे ग्रंथश्रवणी  भाग्य भरा येते! रामायण ये पुन्हा ऐकता, पारायणफल हाती येता  हृदयी ये भरते!१ किति गुण गावे श्रीरामाचे, कौतुक वाटे वाल्मीकींचे  मस्तक ते लवते!२ कर्तव्याची येथे महती, भावनेंहुनी ज्ञाते म्हणती  अर्थ गहन प्रकटे!३ राम गुणांचा राजा आहे, मनामनातुन वसला आहे  रामी मन रमते!५ सकलांचा हा प्राण विसावा, रामचंद्र हा भुलतो भावा  शबरी साक्ष इथे!६ भरतभेट हे दृश्य मनोरम, जिवाशिवांचा सुमधुर संगम  सज्जन मन बनते!७ आत्मा रामच सकल जनांचा, शोध अंतरी लागायाचा  बसु या ध्यानाते!८ तनेमने श्रीरामा भजता, एक एक गुण शिकता शिकता  वर्तन पालटते!९ कलह संपती व्यसने सुटती, भक्तिपथावर चलता पुढती  फलश्रुती येथे!१० समाजजीवन घ्यावा अनुभव, प्रौढत्वातही जपणे शैशव  सगळे हे जमते!११ श्रवण करावे गीती गावे, गीती गावे समरस व्हावे  भक्ति दृढ होते!१२ मन है निर्मळ सुंदर बनते, रामराज्य भूवरती येते  स्वप्न सत्य होते!१३ रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले संकल...