मनोबोधातून श्रीराम दर्शन

 २३. मनोबोधातून श्रीराम दर्शन

श्रीराम जयराम जय जय राम! ध्रु.

मनोबोध तू मुरव मना, जे कळले ते सांग जना
उठता बसता घ्यावे नाम!१

मोह तुला का देहाचा? ध्यास न का तुज देवाचा? 
अंतरि शोधी 'आत्माराम'!२

संशय सगळा सोडुन दे सत्संगी तुज रंगू दे 
नामातून दे सोबत राम!३

अनुभव नसता वटवट रे अनुभव येता आनंद रे 
सोऽहं ध्यानी आहे राम!४

सौख्याचे ही सौख्य असे देवांचा ही देव असे 
अंतरि भवती एकच राम!५

लोभ नको रे द्रव्याचा क्षोभ नको रे चित्ताचा 
नश्वर ते दुःखाचे धाम!६

मना धनंजय असशी रे समर्थ माधव असती रे 
गीता गायन दे विराम!७

त्या देवाला अंत नसे भक्तिपथा मुक्काम नसे 
मना नाम घे हो निष्काम!८

अता भांडणे कोणाशी? मत्सर तरि कुठला करशी? 
एकपणा तो आत्माराम!९

जे जे संकट राघव रे उपाय तोही राघव रे 
धीर धरी नच सोडी नाम!१०

दासबोध हा छोटासा कल्पवृक्ष गमतो खासा 
मननासाठी घ्यावे नाम!११

हताश होणे बरे नव्हे कर्म टाळणे योग्य नव्हे 
प्रयत्न म्हणजे प्रभु श्रीराम!१२

आसुरि संपद सोडत जा दैवी गुण तू जोडत जा
म्हणशिल तू, मी आत्माराम!१३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
श्रोतेमुखी रामायण
संकल्पना : जयंत कृ. देवधर

Comments

Popular posts from this blog

रामसीताविवाह

रावण वध मीमांसा

श्री हनुमंताचा प्रसाद