आरति श्रीरामा गाऊ !

 ३५. आरति श्रीरामा गाऊ !

आरति श्रीरामा गाऊ ! ध्रु.

नाम घेउ या, काम करू या 
अंतरि त्या ध्याऊ !१

प्रेम करू या, मधुर वदू या 
दुःख सुखे साहू !२

नम्र होउ या, विद्या शिकु या 
योगीजन होऊ !३

जसे गाउ या, तसे होउ या 
सत्संगति साधू !४

लाभ होउ दे, हानि होउ दे 
खंबीरच होऊ !५

आत वळू या, आत रमू या 
ध्यानामृत सेवू !६

लोभ न कसला, मत्सर कुठला ?
सुशांत नित राहू !७

तन हे मंदिर, राघव ईश्वर 
इथे तिथे पाहू !८

त्याग शिकू या, योग शिकू या 
उंचावर जाऊ !९

व्यसन नसावे, स्मरण असावे 
सावध नित राहू !१०

तत्त्व शिकू या, कृती करू या 
तेजस्वी होऊ ! ११

सत्य वदू या, सत्य जगू या 
सत्यव्रती होऊ !१२

विजनि राहु या, जनी मिसळु या
रामायण गाऊ !१३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
श्रोतेमुखी रामायण
संकल्पना : जयंत कृ. देवधर

Comments

Popular posts from this blog

रामसीताविवाह

रावण वध मीमांसा

श्री हनुमंताचा प्रसाद