श्रीगोंदवलेकर महाराजांच्या जीवनात श्रीराम

 ३२. श्रीगोंदवलेकर महाराजांच्या जीवनात श्रीराम

श्रीराम जयराम जयजय राम ! ध्रु

श्रीरामाचे घ्यावे नाम 
हळू हळू व्हावे निष्काम
अंतरंग रामाचे धाम !१

नामामध्ये मला पहा 
स्वानंदातच सदा रहा
गोंदवले स्फूर्तीचे स्थान !२

श्रीरामाला पाहू चला
नामाने गुरु भेटविला 
अनुभव ऐसा आला छान !३

विषय वासना दूर पळे 
श्वासासंगे नाम जुळे 
ध्येय ध्याता ध्यानहि राम !४

तुकामाइने प्रेम दिले 
सुखदुःखी सम मज केले
जीवन विद्येचे हे गान !५

सत्य मधुर वच बोलावे 
मना मनाला जोडावे
पूल चांगला आहे नाम !६

घरात रामा आणावे 
घर आपले मंदिर व्हावे 
भल्या बुऱ्याचा साक्षी राम !७

पोशाखीपण नको नको 
संग्रह करणे वेड नको 
सर्वस्वाचा दाता राम !८

आपण सगळे सेवक हो 
मालक राघव आहे हो 
कृतज्ञतेने घ्यावे नाम !९

शरीर मंदिर जाणुन हो 
पवित्र निर्मल राखू हो 
निर्व्यसनी तो असे सुजाण!१०

प्रपंच रामाचा जाणा 
अलिप्ततेचा घ्या बाणा 
नाव लावतो तीरा राम!११

छंद धरूनी नामाचा 
निरोप घेणे जगताचा 
अंतकाळि सोडविता राम!१२

नामस्मरणच पथ्य असे 
समाधानही खूण दिसे 
प्रपंचात परमार्थी राम!१३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
श्रोतेमुखी रामायण
संकल्पना : जयंत कृ. देवधर

Comments

Popular posts from this blog

रामसीताविवाह

रावण वध मीमांसा

श्री हनुमंताचा प्रसाद